Roots

Saturday, September 10, 2016

सकाळचा चंद्र

निशा कशी जलमय होती
आता सकाळ असा दुष्काळी
जणू
मी तरंगत होते
एका भव्य लाटेवर
मग
निद्रेतच छटा कशा बदलत गेले
गडद...
मग फिकट
शेवटी
डोळे उघडल्यावर
निव्वळ, अनवाणी, पांढरा!
मी तीरावर येऊन पोहोचले!
कळलंच नाही!!
जमिनीवर पाय टेकलेत
आणि आता मी चालतीये
खिश्यात हात घालून
दोन-तीनदा माघे वळून पाहते
आता हसू येतंय
माझ्याच प्रलयावर!!

No comments:

Post a Comment