Roots

Wednesday, February 1, 2017

अर्ध चंद्र

स्तब्ध कळ्यांचा तो चंद्र
उगवलाय दूर आकाशात
त्याची अर्धता, पुसटशी
पूर्णतेच्या रेखिवपणाशी घेणं-न-देणं असलेली
कंपार्टमेंटच्या लायटी डाव्या डोळ्याला बोचतांनाही
खिडकीचा वारा उजव्या कानाशी वाद घालतानाही
त्याची मंद शांतता माझ्यातही शिरते
स्मर्नोफ वोडका सारखं
हळू हळू छातीत पसरते
माझ्या स्पंदनांनामधे आजून अंतर आणते
एके दिवशी हा अंतर इतकं लांबावणार
कि श्वास ही स्तब्ध होतील
तेव्हा पर्यंतची ही उघड चळवळ
हे शरीर
हा मेंदू
हे आयुष्य
तरंगांचा
कोटी रंगांचा
धडपड कशाची, कशाला?
नसण्याच्या, असण्याच्या भ्रांतीचा?
आहे, आहे, काहीच नाही
अगदीच काहीच नाही
न राहणार
काहीच
अगदी काहीच नाही
तो चंद्र कदाचित उरणार
कदाचित तो ही विरघळून जाणार
मात्र तो तृप्त आहे
परिपक्व
परिपूर्ण
आणि मीही.
:)

- चा.गि.
06-01-17

(वर्षाची पहिली कविता/First Poem of the Year 😊)

No comments:

Post a Comment