Roots

Monday, August 29, 2016

आकृत्या

माझे डोळे मधाळ आहेत
तपकिरी
प्रकाशाचा थेम्ब पडताच
निखरून उठतात
मी चालतेय
आणि मला आकृत्या दिसतायेत
चौकटी
वर्तुळ
लहान, मोठे
मी त्रिकोण
चालतांना पाहते
मावतच नाही
कुठल्याच आकृतीत
आता ओढ हि कुठे वाटते?
ओढ वाटली तरी
ओढ ओढून तरी कुठे घेते?
मग आकृतींचांही ओढ वाटत नाही
कसला चौकट? कसला वर्तुळ?
आणि कसला त्रिकोण?!
वाकुन पाहते स्वतःकढे
मला धूर दिसतं
स्पष्ट, रंगहीन, मोहक
हम्म...
हेच नाही का खरं?
हेच नाही का बरं?
कुठंही मावुन
मावत नाही
माझ्यात ही मावुन
मावत नाही
मी आहे
अगदीच आहे
तरी मी नाहीये
मी वाहतिये
- चांदनी गिरीजा