Roots

Friday, November 18, 2016

गुजगोष्टी - 1

तो तसा दिसत हि असेन
काळा-कुट्टा
घनदाट
त्याचं काळंपण इतकं गुळगुळीत, सपाट, चकचकीत सापडेल
कि तुझा करडा प्रतिबिंब ही दिसेल त्याच्यावर.
जमिनीवर,
जगाच्या निष्फळ, विष्टासारखा सापडेल तुला.
एकदा उचल
उचल त्याला,
तुझ्या तर्जनी आणि अंगठ्यामध्ये दाबून पहा त्याला
मऊ सापडेल तुला.
जमिनीच्या तापमानामुळे थंड,भावनाशून्य असेल,
पण चावून बघ त्याला
तंतूमय सापडेल तुला.
त्याचा रस जिभेवरून कंठात गिळून बघ
चविष्ट सापडेल तुला.
मग थांबशील का?
कि पुन्हा एक चावा मारशील?
त्याच्या चवीचा प्रवास अखेरपर्यंत नेऊ वाटणार नाही तुला?
तू उभी होतीस,
हातांच्या घडी घालून
दुरुन त्याला पारखत
त्याला काळा समजत.
आता तुझ्या खोलीत जा
कंबरेवर हात ठेव
जीभ बाहेर काढ
आणि साक्ष दे तुझ्या प्रतिबिंबाला
जांभळा रेष सापडेल!!

-चांदनी गिरीजा
18-11-16

ता.क.: "प्रेमाचा रंग कदाचित जांभळा असावा"

No comments:

Post a Comment