Roots

Thursday, November 3, 2016

तुटणे

तुटणे हे वाईट नाही
तुटणे चांगले आहे
भरल्या पोटात किती भोकं आहेत
हे दाखवायला तुटणे गरजेचे
खंबीर पायात किती पोकळी आहे
हे दिसायला तुटणे गरजेचे
वारा, झोकेदार, आला कि
वाकणे गरजेचे
आणि वाकले नाही तर तुटणे गरजेचे
आत्मनिर्भरताच्या गर्विष्ठ थोबाड्यावर
बूट-पॉलिश लावायला
तुटणे गरजेचे
मग धुक्यात हरवणे गरजेचे
आणि धुक्यात कोरलेल्या वाटेत
धुक्यासारख्या तलावात स्वतःचे धूसर प्रतिबिंब सापडले,
मोकळ्या केसा-मोकळ्या दुस्तर विचारांचे,
तर त्यावर सगळ्याच बांधा तोडुन हसणे गरजेचे
तुटणे हे खूपच गरजेचे

- चा.गि. 03-11-16

No comments:

Post a Comment