काळ जाऊदे रे मित्रा,
एक गोष्ट सांगेन तुला,
एका अशांत लाटेची
एका छोट्याश्या दगडाने
उठलेल्या तरंगाची
काळ जाऊदे रे मित्रा
एक गोष्ट सांगेन तुला,
माझ्या तळहाताच्या रेषांवर
उमटलेली एका मेहंदीच्या रेषेबद्दल
काळ जाऊदे रे मित्रा
शेंगदाणे खाताना,
आयुष्याचा वाटाणे झाल्याची
एक गोष्ट सांगेन तुला!
- चा.गि.
No comments:
Post a Comment