Roots

Monday, October 24, 2016

सूरवास

रफीच्या गाण्यांना
आता थोडा तुझा गंध लागलाय.
चेंबूरच्या चांदण्याची
आपल्या पायवाटेच्या तालीची
दारुड्याच्या चालीची
आणि अम्माच्या सुरेख बंगल्याची
रेखाचित्रं त्यांना आता चिटकलेत.
ऐकतांना
आता
माझ्या मेंदूतल्या नाकाला
तुझा आभास होईनच.   

No comments:

Post a Comment