तुझ्या बासुरित मी जीव ओतणारच होते
पण फांदीवर बसून तू हसताना दिसलास
मी मीरा होणारच होते
रुक्मिणीच्या कुशीत राधेला छळतांना दिसलास
तुझं गोंधन कपाळाला लावणारच होते
कुरुक्षेत्रात अर्जुनला चातुर्य शिकवताना दिसलास
काय रे कान्हा!
काल तुझ्यापुढे मी हरले होते
आज तुझं तूच हरलास!
- चांदनी गिरिजा
No comments:
Post a Comment