Roots

Thursday, April 14, 2022

भिंगरी

कुटुंब गोल असतं 
एकाच भिंगरीच्या त्रिज्यात
गोल गोल फिरायचं असतं 
त्याच माणसांसोबत 
मग ती माणसं रोज तुम्हाला 
गुदमरत असतील तरी
हळू-हळू तुमचा लहान-छोटासा 
सळपा कापून खात असली तरी 
त्याच भिंगरीत रहायचं असतं 
त्याच भिंगरीत फिरायचं असतं
पण धाडस करा 
भिंगरी तोडून बाहेर निघा 
जग गोल नाहीये 
जग प्रचंडपणे चौही दिशांनी 
पसरलेलं आहे 
अस्तित्व मात्र खूपच लहान आहे 
म्हणून आजच निर्णय करा 
पुढे माणूस म्हणून जगायचंय  
कि समाजाचा पाळीव कुत्राच राहायचंय?
-
चांदणी गिरीजा 
दिवस १४/३० । ३० दिवसात ३० कविता । राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरीमो 
#napowrimo #napowrimo2022

No comments:

Post a Comment